Home क्राईम जळगावात ट्रॅक्टरचा अपघात ; ७ जखमी,२ गंभीर

जळगावात ट्रॅक्टरचा अपघात ; ७ जखमी,२ गंभीर


जळगाव (प्रतिनिधी) शहरातून बांभोरीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचे पुढील टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात ७ मजूर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जिल्हारुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातून एक ट्रॅक्टर काही मजुरांना घेऊन बांभोरी येथे जात होते. परंतु अचानक आहुजा नगरजवळ ट्रॅक्टरचे पुढील टायर फुटले. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या खोल जागेत पडले. या अपघातात देविदास जावरे,रामकृष्ण तांदळे,संतोष मराठे,दगडू कदम,सुदर्शन लहाने,दीपक वराडे आणि नितीन सुरवाडे हे जखमी झाले आहेत. यातील सुदर्शन लहाने आणि संतोष मराठे यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. दरम्यान, या संदर्भात पोलीस स्थानकात अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound