जळगाव प्रतिनिधी । शहरातील ऑल इंडीया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी इम्रान सय्यद यांनी एमआयडीसी परिसरातील स्वामी पॉलिटेक या कंपनीत झालेल्या 20 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणांत गुप्त माहितीवरून गुप्त तपास करून उल्लेखनीय कामगिरी करून यश मिळवले. त्यानिमित्ताने ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत जळगावतर्फे पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि कामगिरीचा फोटो फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत जळगावचे जिल्हाध्यक्ष भावेश ठाकूर, महिलाध्यक्षा शितल जडे, जिल्हा उपाध्यक्ष तिलोत्तमदास (अतुल) बोंडे, विभाग अध्यक्ष (९) ओमप्रकाश राठोड, जळगांव शहर सचिव कुणाल जडे, रायसोनी कॉलेज चे प्रो. रफिक शेख, उपस्थित होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद यांचा सत्कार
4 years ago
No Comments