मनोज वाणी यांनी आरोप फेटाळले

 

जळगाव : प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केलेले हनी ट्रॅपचे आरोप मनोज वाणी यांनी फेटाळले आहेत . सध्या बाहेरगावी असल्याने जास्त बोलणार नाही पण २ दिवसात परत आल्यावर तपशीलवार भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी लाईव्ह ट्रेण्डशी बोलाताना सांगितले .

मनोज वाणी पुढे म्हणाले कि मी पूर्णपणे व्यावसायिक माणूस आहे कोणत्याच राजकारणाशी किंवा राजकीय व्यक्तीशी मला काहीही देणेघेणे नाही . व्यवसाय आणि राजकारणातील व्यक्तींशी माझा ओळख परिचय असणे तर काही चुकीचे नाही . अशा परिचयातून आपण परिचितांना देतो तसे अभिषेक पाटलांचा मोबाईल नंबर मी बऱ्याच लोकांना दिलेला . माझ्याकडून नंबर घेणाऱ्यांचा पुढे काय हेतू असणार ते मी कसे सांगू ? तरीही जळगावात परत आल्यावर मी जाहीरपणे माझी बाजू मांडणार आहे, असेही ते म्हणाले .

Protected Content