जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीतील कृष्णा पिपटीन कंपनीत काम करतांना गरम पाण्याच्या टाकीत कामगाराचा पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , समाधान हरिभाऊ पनाड (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी) हे एमआयडीसीतील कृष्णा पिपटीन कंपनीत काम करतात. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कंपनीतील गरम पाण्याच्या टाकीत काम करतांना ते पडले. त्यात ते भाजले गेले. त्यांना तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खासगी डॉ. अभिजित चौधरी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पाटील करीत आहे.