Home राजकीय मावळमध्ये नवखा उमेदवार आला तर सांभाळून घ्या : अजित पवार

मावळमध्ये नवखा उमेदवार आला तर सांभाळून घ्या : अजित पवार


Ajit Pawar 500 2

मुंबई (प्रतिनिधी) उद्या पक्ष कोण उमेदवार देतो याचा निर्णय यायचा आहे. कदाचित उमेदवार नवखाही येण्याची शक्यता आहे. जर नवखा आला तर त्याला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केले आहे.

 

नवी मुंबईत काल अजित पवारांनीही शेकापच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, पक्षाने तरुणांना संधी देण्याचा विचार केला आहे. उद्या पक्ष कोण उमेदवार देतो याचा निर्णय यायचा आहे. कदाचित उमेदवार नवखाही येण्याची शक्यता आहे. जर नवखा आला तर त्याला सांभाळून घ्या, अनुभवी आला तर प्रश्नच नाही. या गोष्टीचा विचार सर्व सहकाऱ्यांनी करावा. तसेच समोरचा उमेदवार तुल्यबळ असल्याचे समजून कामाला लागा. गाफील राहू नका, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound