जळगाव प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगांव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाचे पथकामार्फत अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. या तीनही नदीपात्रात आता वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे, असे आदेश पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी काढले आहे.
सध्या या तीनही नदीपात्रात अधिकृत लिलाव देण्यात आलेले नसून अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्यादृष्टीने पाचोरा तालुक्यातील बांबरुड खु. पुनगांव, मांडकी, ओझर, अंतुर्ली बु.प्र.पा. भातखंडे खु. परधारडे, बहूळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र.बो, बाळद बु. नाचणखेडे, होळ, सांगवी बु. प्र.भ. घुसर्डी बु. प्र.भ. वडगाव खु. प्र.भ व पिंप्री बु. प्र.भ. तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव, बांबरुड प्र.उ. गिरड, कराब, वडदे, वाडे, पिंपळगाव बु. भटटूगांव, अंतुर्ली बु. भातखंडे बु. नावरे, बाळद खु. गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये. तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रात वाळू वाहतूक/उत्खनन करणा-या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग पाचोरा फौजदारी प्रक्रिया संहित 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार दिनांक 15 ऑक्टोंबर, 2020 रोजी सकाळ पासून ते दिनांक 14 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाचोरा तालुक्यातील बांबरुड खु. पुनगांव, माडकी, ओझर, अंतुर्ली बु. प्र.पा. भातखेडे खु. परधारडे, बहुळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र.बो. बाळद बु. नाचणखेडे, होळ, सांगवी बु.प्र.भ. घुसर्डी बु. प्र.भ. वडगाव खु. प्र.भ. व पिंप्री बु. प्र.भ तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव बांबरुड प्र.उ. गिरड, कराब, वडदे, टेकवाडे, वाडे, पिंपळगाव बु. भट्टगांव, अंतुर्ली बु. भातखंडे बु. नावरे , बाळद खु. गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रात वाळू वाहतुक/उत्खनन करणाऱ्या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करीत आहे. कोणत्याही व्यक्तीने वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द भारतीय दंडसंहिता 1860 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरचा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन तसेच सदर क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिका-याने परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.