Home क्राईम जळगावात समाजमंदिर फोडले; ७० हजारांचा ऐवज लंपास

जळगावात समाजमंदिर फोडले; ७० हजारांचा ऐवज लंपास


18629783 9755 4ded 8707 9b64290daa8d

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मीनगरात क्षत्रिय सालवी(परदेशी) समाज मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी साधारण ७० हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या घटनेमुळे समाजबांधव संतप्त झाले असून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

या संदर्भात अधिक असे की, जळगाव-कानळदा रस्त्यावर लक्ष्मीनगरात क्षत्रिय साळवी (परदेशी) समाज मंदिर आहे. या समाज मंदिरात टेंट हाऊसची भांडी व माईक सिस्टीम ठेवलेली होती.अज्ञात चोरट्यांनी हॉलच्या लोखंडी गेटखालील भिंत फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी साधारण ६० ते ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, समाज मंदिराच्या आवारात एक हातोडी आढळून आली असून त्याच्याच साहाय्याने भिंत फोडल्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound