देवरिया: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यक्रमात महिला नेत्याशी कार्यकर्त्यांची हाणामारी झाली बलात्कारी आरोपीला उमेदवारी देण्यास आपण विरोध करत होतो म्हणूनच मारहाण केल्याचा यादव यांचा आरोप आहे.
तारा यादव असे या महिला नेत्याचे नाव असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. तारा यादव यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
देवरियामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुकुंद भास्कर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, मुकुंद भास्कर यांना उमेदवारी देण्याला तारा यादव यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारले मुकुंद भास्कर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी देण्यावर आपण प्रश्न उपस्थित करत होतो, असे तारा यादव म्हणाल्या.
आता प्रियांका गांधी काय कारवाई करणार याची वाट पाहत असल्याचे तारा यादव म्हणाल्या. एकीकडे आमच्या पक्षाच्या नेत्या हाथरस पीडितेला न्याय मिळावा म्हणून लढाई लढत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे तिकीट बलात्कारी व्यक्तीला दिले जात आहे. पक्षाचा हा निर्णय पक्षाच्या प्रतिमेला मलीन करेल, असे तारा
महिला आयोगानेही दंखल घेतली आहे. आम्ही या घटनेची दखल घेतली असून २५ लोक महिला नेत्याला मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांनी राजकारणात आले पाहिजे असे आम्ही सांगत असताना हे गंभीर आहे. राजकारणातील लोक महिला कार्यकर्त्यांसोबत गुंडांप्रमाणे व्यवहार करत आहेत. अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.