जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वन्य जीव सप्ताहानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेसाठी वन्य प्राणी हा विषय दिला होता. विद्यार्थ्यांनी सशापासून ते वाघापर्यंत अशा विविध प्राण्यांचे चित्र काढले. मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांनी वन्यप्राण्यांचे आपण कसे संरक्षण केले पाहिजे तसेच प्राण्यांसाठी असलेल्या अभयारण्ये या विषयी माहिती दिली. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सतिश भोळे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
पाचवीतून भूमिका गोपाळ चौधरी प्रथम तर द्वितीय साईराज समाधान पाटील, तृतीय रोशनी जितेंद्र कोळी.
सहावीतून दामोदर धनंजय चौधरी ही प्रथम तर द्वितीय सिद्धी संदीप मेटकर आणि तृतीय डिंगबर शेखर पाटील. आणि
सातवीतून प्रथम मानसी सुधीर खडसे ही प्रथम तर द्वितीय हर्षल कमलाकर चौधरी आणि तृतीय उत्कर्षा देवेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.