Home राजकीय अखेर ‘त्या’ सराफाची बिनशर्त माफी

अखेर ‘त्या’ सराफाची बिनशर्त माफी


मुंबई – मराठीचा आग्रह धरल्याने महिलेस अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाने अखेर माफी मागितली आहे.

कुलाब्यात महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे या महिलेशी मराठीत बोलण्यास नकार दिला. यामुळे त्यांनी जवळपास 20 तास ठिय्या दिला. शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी माणसे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे. मला माफ करा, असं या सराफा व्यावसायिक म्हणाला. मात्र शोभा देशपांडे यांचे पाय धरुन माफी मागा, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी केला. माफी मागितल्यानंतर पोलीस महावीर ज्वेलर्सच्या मालकाला घेऊन गेले.


Protected Content

Play sound