मुंबई: वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज हृदय विकाराचा झटका आल्यानं निधन झालं . आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९० च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांंच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती.
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. होत्या तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.
सदाबहार असे अविनाश खर्शीकर यांची पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ त्यांनी महत्वाची भुमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते.