जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०१९ पुर्वी पदवी, पदविका परिक्षा उत्तीर्ण केलेलया विद्यार्थ्यांकरीता आणि पीएच.डी. धारकांना 29 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठ संकेतस्थळावर भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 29 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळणेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.nmu.ac.in वर होम पेज वरील स्टुडंट कॉर्नर, परीक्षा, कॉन्व्होकेशनवर विद्याथ्र्यना ऑनलाईन अर्ज व शुल्क भरता येणार आहे. हे अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबर, 2020 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसेच माहे एप्रिल/मे, 2020 च्या होणाज्या परीक्षेत उत्तीर्ण होणाज्या विद्याथ्र्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचा कालावधी परीक्षा निकाल जाहिर झाल्यानंतर कळविण्यात येईल असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.