Home क्राईम पाचोरा येथे दुकान फोडीचा प्रयत्न फसला;एकाला रंगेहाथ अटक

पाचोरा येथे दुकान फोडीचा प्रयत्न फसला;एकाला रंगेहाथ अटक


 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील भाजी मंडी भागात श्री कृष्णा डेरी शेजारी मध्यरात्री काही चोरटे दुकान फोडत होते. नेमके त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांचावर झडप घातली. यावेळी दोन चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले तर एकाला अटक करण्यात आली आहे.

 

या संदर्भात अध्क असे की, मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या सुमारास भाजी मंडी भागात श्री कृष्णा डेरी शेजारी तीन चोरटे लोखंडी हत्यारच्या सहायाने दुकान फोडण्याचा प्रयत्न करत होते. नेमके याचवेळी पाचोरा पोलिसांचे एक पथक गस्त घालत होते. पथकातील कर्मचारीनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्यावर झडप घातली. परंतु या झटापटीत दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झालेत. तर एका आरोपीला मोटरसायकल व हत्यारसह अटक करण्यात आली आहे. या पथकात पोलीस कर्मचारी राहुल सोनवणे, नरेंद्र शिंदे,राहुल बेहरे व प्रशांत चौधरी यांचा समावेश होता. याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल झाल्याची माहिती अजून प्राप्त झाली नाही


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound