पहूर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषदेच्या शाळेत आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
अधिक वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत आज दिनांक २ अॉक्टोबंर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी गजानन पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, सदस्य शिवाजी डोंगरे, नाना सुरळकर, पोलीस पाटील समाधान पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सहकार महर्षी गजानन पाटील यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पाटील परिवाराने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क तसेच अंगणवाडी व शाळा यांना सॅनिटायझरचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक देवाजी पाटील यांनी केले व आभार उपशिक्षक विकास वराडे यांनी मानले. मयुरी सुरळकर, नाना सुरळकर, देवाजी पाटील, भगवान पाटील, समाधान पाटील,मयुर पाटील, पी.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण गजानन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विद्याधर पाटील, दिलीप पाटील, रामचंद्र पाटील, मयुर पाटील, रूपेश पाटील, अथर्व पाटील, दिपक पाटील, तेजस पाटील, दिनेश पाटील, बापु लोहार, आनंदा कोते, अंगणवाडी सेविका बेबाबाई पाटील, कविता डोंगरे, रूपाली आगळे शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, विकास वराडे, श्रीमती छाया पारधे, रामेश्वर आहेर व विद्यार्थी उपस्थित होते.