ट्रम्पसह खासगी सल्लागार होप हिक्स कोरोनाबाधित

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला लागण झाल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. अहवाल आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून लागण झाली असल्याचे म्हटले आहे. अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या होप हिक्सला लागण होणे हे धक्कादायक आहे. होप हिक्स या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमित प्रवास करतात. होप हिक्स व अन्य काही अधिकारी क्लीवलँड, ओहियो येथे निवडणुकीच्या कामासाठी गेले होते.

Protected Content