जळगाव प्रतिनिधी । आरएए औरंगाबाद यांच्या माध्यमातून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 2017 ते 2020 या तीन वर्षाच्या कालावधीत माध्यमिक इंग्रजी विषय शिक्षकांसाठी चेस प्रोजेक्ट राबविण्यात आला असून प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या जळगाव शहर व तालुक्यातील ईटीएफ सदस्यांना (ETF MEMBERS)गुरुवार दि.१ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता जळगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एस.एस. चौधरी, तालुक्याचे विस्ताराधिकारी बिर्हाडे व शेख साहेब यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती हॉलमध्ये १० शिक्षकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात वितरण केले गेले. त्यानंतर इतर शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या याप्रसंगी जळगाव तालुक्याचे Mentor गणेश बच्छाव यांनी तीन वर्ष यशस्वीरित्या राबविल्या गेलेल्या ईटीएफ मिटींग्स, शिक्षकांचा त्यातील सहभाग, ईटीएफ मीटिंगचे इंग्रजी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना झालेले फायदे, त्यांच्यात झालेले अमुलाग्र बदल आणि English ecosystem निर्माण करण्यात प्रोजेक्टची भूमिका इ. प्रास्ताविकात विशद केले. गट शिक्षणाधिकारी चौधरी व विस्तार अधिकारी बिर्हाडे यांनी या चेस प्रोजेक्ट अंतर्गत घेतलेल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जळगाव शहराचे Mentorटी.बी.पांढरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधनव्यक्ती सुचिता मॅडम, कांबळे, पाटोळे तसेच सर्व ईटीएफ मेंबर्स यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आर. के. पाटील यांनी केले.