पाचोरा, प्रतिनिधी । धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पाचोरा तालुका धनगर समाजातर्फे निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मागील बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीत धनगर समाज समाविष्ट असतांना सुध्दा धनगर समाज वंचीत आहे. वेळोवेळी केंद्र व राज्य सरकार फक्त अंमलबजावणीचे आश्वासन देते व पुन्हा विसरते. समाजाला सध्याचा राज्य सरकार कडून दहा महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयावर एकही बैठक न घेता समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे धनगर समाजाच्या प्रत्येक माणसात सरकार विषयी प्रचंड प्रमाणात असंतोष व नाराजी आहे. निवेदन देतांना नगरसेवक बापु हाटकर, किशोर पेंढारकर, जित पेंढारकर, विलास पाटील, संजय परदेशी, सुनिल निळे, नाना कंखरे, प्रकाश गढरी, आचरणात पाटील,यश पेंढारकर, संतोष हाटकर, निवृत्ती हाटकर, रोहीत धनगर, सचिन थोरात, महेद्र पाटील, यांच्या सह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.