पंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धयांचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना व डेंग्यू यांच्या संसर्ग होऊ नये याकरता पंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी नगर परिसरात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्वखर्चाने औषध फवारणी करून कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

पंडित दीनदयाल उपाध्य यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीनगर दवाखाना, शिवाजी नगर मराठी शाळा, शिवाजीनगर पोलीस चौकी, तहसील कार्यालय, सिटी पोलीस स्टेशन एरिया, मुख्य भाजप कार्यालय या भागांमध्ये भाजप मंडळ क्रमांक १च्या वतीने व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या स्वखर्चाने औषधी फवारणी करून घेतली. तसेच कोरोना योद्धांची भूमिका बजावत असणाऱ्या महापालिका कर्मचारी यांचा सानिटीझर , मास्क, ग्लोज,फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, व मंडळातील सर्व लोकं प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content