जळगाव प्रतिनिधी । आज देखील जिल्ह्यात ४०३ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले आहे. तर आजच ८२० रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईला कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्यांची संख्या आता गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात नवीन ४०३ कोरोना बाधीत आढळून आले आहे. मात्र, यासोबत आज जिल्ह्यातील ८२० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- ९१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ-६६; अमळनेर-२९; चोपडा-३०; पाचोरा-२; भडगाव-४; धरणगाव-२०; यावल-३३; एरंडोल-२१; जामनेर-१८; रावेर-७; पारोळा-२४; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-१०; बोदवड-०५ आणि इतर जिल्ह्यांमधील ५ असे एकुण ४०३ रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आज ८२० रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ३६,७८१ इतकी झाली आहे. तर आज ८ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११४५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८३४९ इतके आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews