Home Cities पारोळा कोरोनाच्या प्रतिकारासाठी आदर्श शिक्षकातर्फे मदत

कोरोनाच्या प्रतिकारासाठी आदर्श शिक्षकातर्फे मदत

0
24

पारोळा प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी कोरोना मदत प्रकल्पासाठी पाच हजार रुपयाचा निधी दिला आहे.

येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी कोरोना मदत प्रकल्पासाठी सकाळ रिलीफ फंडाला पाच हजार रुपयाचा निधी दिला असून कोरोना बाधितांसाठी आता पर्यंत त्यांचे योगदान ५५ हजार रुपये इतके झाले आहे.

एक संवेदनशील, उपक्रमशील व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून भावसार सरांची ओळख आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून समाजोपयोगी विविध उपक्रम ते व्यक्तीश: स्वखर्चाने राबवत असून विविध संस्था/ संघटना, राज्य/ राष्ट्र, आपत्तीग्रस्त व गरजू व्यक्ती यांना नेहमीच मदत करत असतात.यामुळेच त्यांना १८ पुरस्कार व कोरोना योद्धा म्हणून तब्बल २० सन्मानपत्रे मिळाली आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound