Home आरोग्य आजही कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक !

आजही कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक !

0
100

जळगाव प्रतिनिधी । आज देखील जिल्ह्यात ४४३ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले आहे तर आजच ७८३ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईला बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्‍यांची संख्या आता गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे सोबत बरे होणार्‍यांची संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. आज जिल्ह्यात नवीन ४४३ कोरोना बाधीत आढळून आले आहे. मात्र, यासोबत आज जिल्ह्यातील ७८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये जळगाव शहरात ११४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीणी- ६, भुसावळ-५३; अमळनेर-४१; चोपडा-४३; पाचोरा-१४; भडगाव-१०; धरणगाव-७; यावल-२५; एरंडोल-१२; जामनेर-१९; रावेर-३३; पारोळा-११; चाळीसगाव-३८; मुक्ताईनगर-४; बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यांमधील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज ७८३ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३५,९६१ इतकी झाली आहे. तर आज ८ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११३७ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८७७४ इतके आहेत.


Protected Content

Play sound