नवी दिल्ली वृत्तसंस्था । कुक्कुट पालनामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने त्यांना नियमांमधून सवलत देण्यात येऊ नये असे निर्देश आज राष्ट्रीय हरीत लवादाने दिले आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीत हे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
पोल्टी फॉर्मला पाणी (प्रदुषणाला अटकाव आणि नियंत्रण) कायद्यातून सवलत देणारे सीपीसीबीचे दिशानिर्देश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्या गौरी मुलेखी यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना एनजीटीने हे निर्देश दिले आहेत.
पोल्ट्री फॉर्मला हरित श्रेणी उद्योगांमध्ये वर्गीकृत करण्यासह विविध कायद्यान्वे या उद्योगाला मिळालेल्या सवलतींच्या दिशानिर्देशांसंबंधित सुधारणा करण्याचे निर्देश एनजीटी ने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी) दिले आहेत.
तीन महिन्यांच्या आत सुधारित दिशानिर्देश जारी करण्याचे आदेश एनजीटी अध्यक्ष न्यायमूर्ती ए.के.गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीपीसीबीला तीन महिन्यांच्या आत नवीन आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. कुठलेही नवीन आदेश काढण्यात आले नाही, तर सर्व राज्य प्रदूषण मंडळांनी हवा, पाणी तसेच पर्यावरणाच्या संरक्षण कायद्यान्वे योग्य ती यंत्रणा यासंबंधी कार्यान्वित करावी लागेल, असे एनजीडीकडून सांगण्यात आले आहे. पोल्ट्री फॉर्ममुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याने हे प्रदूषण नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे, असे मतही एनजीटीकडून व्यक्त करण्यात आले.