मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने आज झालेल्या बैठकीत २१ ते २३ असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर प्रत्येक रविवारी याच प्रकारे कर्फ्यू पालन करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
दरदिवसाला कोरोना बाधीत रुग्ण आढळून येतच आहेत. या अनुषंगाने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात दि.२१,२२ व २३ सप्टेंबर असे तीन दिवस जनता कर्फ्यू घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच पुढील आठवड्यापासून आठवड्यातून एक दिवस म्हणजेच प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. जनता कर्फ्यु काळात दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
या बैठकीला आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार प्रदीप झांबरे , नगरपंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक कैलास भारसके , व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन (बंटी) जैन , प्रवीण शुरपाटणे, विनोद नायर यांची उपस्थिती होती.