भाजपा पक्षाला भगदाड : लोकनियुक्त सरपंच शिवसेनेत

 

सावदा, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण तालुका-रावेर गावचे लोकनियुक्त सरपंच सचिन भिल यांची शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात आज दि १७ रोजी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

सचिन भिल यांनी थोरगव्हाण गावाच्या विकास काम करिता जोमाने विकास कामे व्हावी याकरिता प्रवेश केला असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री. भिल यांच्या शिवसेना प्रवेश प्रसंगी त्यांच्यासोबत युवा सेना जिल्हा सरचिटणीस सूरज परदेशी, शिवसेना शाखा प्रमुख पंकज पाटील ,रणगावचे सरपंच विश्वनाथ कोळी , थोरगव्हाण ग्राप सद्स्य नितीन ( नारायण ) चौधरी,तुषार महाजन, अनिल झोपे, बाळू पाटील, प्रफुल्ल पाटील ,किशोर कोलते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content