Home आरोग्य पिंप्रीत सोमवारपासून दोन दिवशीय जनता कर्फ्यु

पिंप्रीत सोमवारपासून दोन दिवशीय जनता कर्फ्यु

0
61

पिंप्री खुर्द ता. धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पिंप्री खुर्द गावात ( दि.१४ व १५ सप्टेंबर) पर्यंत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती, व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने हा बंदीच्या निर्णय घेण्यात आला आहे. या बंद काळात गावातील फक्त दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पर्यतच सुरू राहिल. या व्यतरिक्त मेडीकल सह सर्वच व्यावसाईक दुकाने दोन दिवस कडकडीत बंद राहतील .

मंगळवार हा बाजाराच्या दिवस असतो. शासनाच्या आदेशान्वेय बाजार बंद असुन त्या दिवशी गावात बाहेरून येणारे व्यवसाईक व परिसरातील सर्वच गावातील खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ होते . हि बाब लक्षात घेता दर मंगळवारी गावातील सर्वच व्यवसायीक प्रातिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी ग्रामस्थांनी या बंद काळात विनाकारण घरा बाहेर फिरू नये. आपल्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या दोन दिवसीय जनता कर्फ्यूस व दर मंगळवारी गाव बंद यास सहकार्य करावे , असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समिती , व्यापारी ,व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांनी केले आहे .

 

 

 

 

 

 

 


Protected Content

Play sound