Home आरोग्य गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा धमकीचा फोन

गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा धमकीचा फोन

0
19


 

नागपूर- गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी आणि रविवारी धमकीचे फोन आल्यानंतर तपास यंत्रणांनी फोन करणार्‍यांची चौकशी सुरू केली असतानाच मंगळवारी सकाळी पुन्हा देशमुख यांच्या बंगल्यावर धमकीचा फोन आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना वेगवेगळ्या वेळी आलेल्या धमकीच्या फोनमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी ११. ३४ ला गृहमंत्री देशमुख यांच्या स्थानिक निवासस्थानी लँड लाईनवर पुन्हा धमकीचा फोन आला. ऑपरेटरने फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड खालीद बोलतो, असे तो म्हणाला. ‘तुझ्या साहेबांना माझे नाव सांग आणि कंगना रानौत प्रकरणात जास्त लक्ष देऊ नका. असा निरोप दे, असे कॉलर म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.


Protected Content

Play sound