जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाचे कान्ह ललित कला केंद्राने गणेशोत्सव काळात ऑनलाइन घेतलेल्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले.
सध्या सर्वदूर कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करत विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता कान्ह ललित कला केंद्राने चित्रकला,नाट्य,नृत्य,व संगीत या ऑनलाईन प्रवेशिका मागवून स्पर्धा घेतल्या यात विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विजेत्यांचे के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे , मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी अभिनंदन केले आहे.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक मिलन भामरे, हेमंत पाटील, कपिल शिंगाने, अजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.सदर ऑनलाइन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरणाची तारीख लवकरच विजेत्यांना संपर्क करून कळवली जाईल.असे संचालक मिलन भामरे यांनी कळविले आहे.
तर विभाग स्तरीय निकाल खालीलप्रमाणे – चित्रकला विभाग ऑनलाइन स्पर्धा निकाल; लहान गट= हर्षदा संतोष पाटील- प्रथम, रिया योगेश सोमाणी- द्वितीय, साक्षी प्रवीण परदेसी – तृतीय लहान गट ( उत्तेजनार्थ ) = अनुष्का प्रल्हाद पाटील, सुरभी रुपेश भक्कड, मोठा गट = अंकिता वीरेंद्र सिंघ राजपूत- प्रथम, कोळी छबिली पाटील- द्वितीय, धीरज अरुण मोडले- तृतीय. मोठा गट ( उत्तेजनार्थ ) सायली रवींद्र पवार, स्नेहल सुनील महाजन नाट्य विभाग -लहान गट पूर्व जाधव – प्रथम, दुर्वा देसाई – द्वितीय, रसिका मिलिंद जोशी- तृतीय मोठा गट बकुल धवने- प्रथम, श्रेयस बोरसे- द्वितीय
गणपती गायन लहान गट, धनश्री विनोद कुलकर्णी- प्रथम, श्रुती प्रमोद वैद्य- द्वितीय, रसिका मिलिंद जोशी- तृतीयमोठा गट नम्रता अशोक सुरवाडकर- प्रथम, प्रणाली शैलेंद्र बागड- द्वितीय, दिशांत दिलीप वानखेडे- तृतीय तबला वादन लहान गट, कार्तिकी धनंजय अहिरे- प्रथम, करण पंकज पाटील – द्वितीय, प्रसन्न चंद्रशेखर भुरे- तृतीय मोठा गट रोहित सुरेश श्रीवंत- प्रथम, उमेश ललित सूर्यवंशी- द्वितीय, ऐश्वर्य अशोक कोळी- तृतीय नृत्य कला लहान गट नियती किशोर राणे- प्रथम, निष्का सचिन शिंदे- द्वितीय, आरव मेहुल देढीया- तृतीय, ईश्वरी प्रशांत शिंदे- उत्तेजनार्थ, श्रेयस काशिनाथ बोरसे- उत्तेजनार्थ मोठा गट प्रियांका मिलिन सदावर्ते – प्रथम, साधना बदलू प्रजापत – द्वितीय, सुवर्ण मदन बारेला- तृतीय, गणेश महेन्द्रकुमार सैनी- उत्तेजनार्थ.