मुंबई प्रतिनिधी । सध्या काही कलावंत व न्यूज अँकर्स महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले असून त्यांनी आडून खेळण्यापेक्षा थेट राजकारणतच येण्याचे आव्हान महिला व बालकविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर दिले आहे.
यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ठाकूर म्हणाल्या, काही सिनेकलाकार – न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा,पण म्हणून इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका. जाता जाता – राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून आडून खेळण्यात काही मजा नाही!
अनेक न्यूज चॅनल्सवर महाराष्ट्राच्या बदनामीची मोहिम सुरू असून यात काही कलावंतही हातभार लावत आहेत. या पार्श्वभूमिवर यशोमती ठाकूर यांच्या टिकेचा रोख हे पत्रकार व सिने कलावंतांकडे असल्याचे दिसून येत आहे.