चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील माजी उपसरपंच बारकू पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांंच्या उपस्थितीत प्रवेश केला.
चोपडा तालुक्यातील वर्डी येथील माजी उपसरपंच बारकू लक्ष्मण पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये दाखल झाले. प्रवेश केल्यानांतर बारकू पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी पक्ष वाढी साठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. त्यावेळी प्रदीप पाटील, पंकज पाटील, प्रकाश पाटील, राकेश पाटील, नरेंद्र पाटील, विकास पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.