जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी.एस.नेमाडे ( वय 85 ) यांना आज देवाज्ञा झाले. गजानन हार्ट क्रिटिकल सेंटरचे डॉ.विवेक चौधरी यांचे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच विद्यार्थी यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते.महाविद्यालयात नाविन्याचा ते सतत ध्यास घेत असत. नेमाडे सर नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व कौतुक करीत असत. त्यांच्या कारकिर्दीत काही वेगवेगळ्या विभागाच्या वास्तूंची उभारणीही झाली होती. मेहरूण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.