भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील एक विद्यार्थी तापी नदिच्या पुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष बी. चौधरी यांनी प्रसंगावधान राखून पोलिसांना माहिती दिली. तर पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचविले.
शहरातील एक विद्यार्थी तणावग्रस्त स्थितीत तापी नदीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता. इतक्यात अकलूद होऊन येणारे नागरिकास या विद्यार्थ्यांची स्थिती शंकास्पद वाटली. त्यांनी लागलीच गाडी थांबवत बाजारपेठ पोलिसांना पाचारण केले. मात्र ही हद्द शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात येते. परंतु पोलिसांनी हद्दवादचा वाद न करता, तत्परतेने पुलावर जाऊन विद्यार्थ्यास आत्महत्येपासून परावृत्त करीत त्याचा जीव वाचवला.
शहरातील गडकरी नगर भागातील एक तरूण विद्यार्थी रात्री ८.३५ च्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न तापी नदी पुलावर करत होता. इतक्यात आनंद नगर भागातील रहिवासी संतोष बी.चौधरी अकलूद येथून येत असताना त्यांनी या विद्यार्थ्यांस पाहिले असता, त्याची स्थिती समजून घेत, त्यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला फोन वर संपर्क साधला. पोलीस प्रशासन यांनी हद्दीची पर्वा न करता, बाजारपेठ चे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती मिळताच पोलीस कर्मचार्यांना घटनास्थळी पाठून त्या विद्यार्थीला त्यांच्या आई वडील च्या ताब्यात देण्यात आले. पोलीस कर्मचारी प्रशांत परदेशी, पोलीस नाईक रविंद्र बिर्हाडे, हवलदार प्रभाकर चौधरी यांनी तिथे धाव घेतली आणि विद्यार्थ्यांची समजूत घातली व त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. यामुळे खाकीतल्या माणुसकीचे दर्शन या ठिकाणी घडले.
सविस्तर माहिती खालील व्हिडीओत पहा.