Home आरोग्य कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त !

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त !

0
67

मुंबई : कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 1200 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत.

याआधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्टसाठी आता जास्तीत जास्त 2800 रुपये इतका दर आकारला जात होता. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता. तर प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास 2200 रुपये दर निश्चित करण्यात आला होता.

भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी (4,95,51,507) इतका आहे . गेल्या 24 तासात 0देशात 7,20,362 चाचण्या करण्यात आल्या. देशभरात चाचण्यांची गती आणि व्याप्ती वाढवल्यामुळे, केवळ गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या.


Protected Content

Play sound