जळगाव शहरात कोरोनाचा कहर; जिल्ह्यात आज ११८५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ११८५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात तर जळगाव शहरात पहिल्यांदा ३२८ रूग्ण आढळून आलेत. तर यावल, चाळीसगाव, पारोळा तालुक्यात लक्षणिय रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजच ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ११८५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ३२८ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-३२८; जळगाव ग्रामीण-८२; भुसावळ-५५; अमळनेर-८२; चोपडा-६२; पाचोरा-६५; भडगाव-३८; धरणगाव-२८; यावल-१०६; एरंडोल-२९, जामनेर-२६; रावेर-१७; पारोळा-७१; चाळीसगाव-९५; मुक्ताईनगर-७१, बोदवड-१३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १७ असे एकुण १ हजार १८५ आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३३ हजार ६१८ इतकी झालेली आहे. यातील २३ हजार ३४३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५१७ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ७ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८७७ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ३९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content