Home Cities जळगाव तहसिलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध

तहसिलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध


tahasil

जळगाव (प्रतिनिधी) । रेशनकार्ड असून रेशनकार्डधारकांना रेशन मिळत नसल्याने महिलादिनाच्या निमित्ताने संतप्त महिलांना ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणा देत तहसिलदार यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करत  जळगाव तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी प्रभारी तहसीलदार जाधव यांना रेशन मिळावे यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनही दिले. मात्र प्रभारी तहसिलदार मागण्यांचे निवेदन घेवून कार्यालयातून निघून गेले. यामुळे संतप्त महिलांनीगेल्या पाच तासापासून सदरील महिला तहसिलदारांना भेटण्यासाठी थांबून होत्या. यामुळे संतप्त महिलांना आक्रमक भूमिका घेतली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound