नवी दिल्ली- भारतीय रेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. आता पुन्हा रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनलाही सुरुवात होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी आज ही माहिती दिली.
दूरच्या प्रवासासाठी 12 सप्टेंबरपासून 80 विशेष रेल्वेगाड्यांची सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या प्रवासासाठी 10 सप्टेंबरपासून आरक्षणही सुरू केले जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी शनिवारी ही माहिती दिली.
12 सप्टेंबरपासून 80 नवीन विशेष रेल्वेगाड्या किंवा 40 जोड्या गाड्यांचे काम सुरू होईल. या रेल्वेगाड्यांमधील प्रवासासाठीचे आरक्षण 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. आधीच सुरू असलेल्या 230 गाड्यांव्यतिरिक्त या विशेष रेल्वे धावतील. सध्या कोणत्या गाड्यांना मोठी प्रतीक्षा यादी आहे हे शोध्ण्यासाठी रेल्वे सध्या कार्यरत असलेल्या सर्व गाड्यांचे निरीक्षण करणार आहे.
जेथे जेथे विशेष रेल्वेची मागणी असेल. जेथे प्रतिक्षा यादी मोठी असेल, तेथे प्रवाशांना प्रवास करता यावा, यासाठी प्रत्यक्ष रेल्वेच्या पुढे क्लोन ट्रेनही चालवली जाईल, असेही यादव म्हणाले.
परीक्षा किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी एखाद्या राज्यांमध्ये विशेष रेल्वेची मागणी असल्यास या विशेष रेल्वे चालवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.