जळगाव प्रतिनिधी । लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल तर्फे कोरोना काळात विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षणाचे सृजनशील मार्ग शोधणार्या व ऑनलाईन शिक्षण पोहचविणार्या शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमधील एकूण 28 शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हा सन्मान सोहळा प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन करण्यात आला. या शिक्षकांचा गौरवबाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार, एस.एम कोगटा, के व्ही पाटील, रायसोनी महाविद्यालयाचे प्राचार्या प्रीती अग्रवाल, डॉ. मकरंद वाठ, रफिक शेख, किड्स गुरुकुल इंटरन्याशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मीनल जैन, ममता खोना, श्रद्धा तलरेजा, उज्वल स्कूलच्या मुख्याध्यापिका मानसी भदादे, मनीषा ढाके, सुनयना चोरडिया, एम. जे. महाविद्यालायचे प्राचार्य संजय भारंबे, जयप्रकाश चौधरी, डॉ. भूपेंद्र केसुर, आय.एम.आर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अनुपमा चौधरी, डॉ. विशाल संदानशिव, प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रध्दा धुनाके, सुनिता नारखेडे, विजया चावरे, प्रगती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील भाग्यश्री तळेले, प्रगती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांचा तसेच चित्रकला शिक्षक तरुण भाटे, -शिक्षिका तृप्ती नागदा, नृत्य शिक्षक अखिल तिलकपुरे, क्रीडा प्रशिक्षक अतुल देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी लायन्स कल्ब सेन्ट्रल जळगाव तर्फे अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव अविनाश कक्कड, कोषाध्यक्ष दिनेश राका, उपाध्यक्ष मनीष मंडोरे, शिरीष सिसोदिया, पराग लुंकड हे उपस्थित होते.