Home Cities जळगाव बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश नारखेडे यांचे देहावसान

बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश नारखेडे यांचे देहावसान

0
35

जळगाव प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाश आनंदा नारखेडे उर्फ संतोष शेठ यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक व माजी सभापती प्रकाश आनंदा नारखेडे उर्फ संतोष शेठ यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंतीम संस्कार करण्यात आले. मूळचे भादली येथील रहिवासी असणारे प्रकाश नारखेडे हे गत काही दिवसांपासून व्याधीग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक मातब्बर व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound