नवी दिल्ली । काल देहावसान झालेले माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या फुफ्फुसातही संसर्ग झाला. ते व्हेंटीलेटरवर होते.
दरम्यान, उपचार सुरू असतांना प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज लोधी स्मशान घाट येथे राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील येथे पीपीई किट घालून उपस्थित होते.