जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊन काळातील गाळ्यांच्या भाड्याची आकारणी करण्यात येऊ नये अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युन्सिपल मार्केट व्यापारी आसोसिएशनतर्फे महापौर, स्थायी समिती सभापती व आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत शासन निर्देशाप्रमाणे फुले मार्केट बंद ठेवण्यात आले होते. यात २२ मार्च ते ५ ऑगस्ट पर्यत सर्व व्यवहार पूर्णतः बंद होते. यामुळे महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युन्सिपल मार्केट मधील सर्व गाळ्यांचे गाळे भाडे व इतर करांची कोणतीही आकारणी करू नये अशी विनंती आसोसिएशनतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी सेट्ल फुले मार्केट अध्यक्ष रमेश मताणी ,चेतन दास कारडा.,दिपक मंधाण, .बबलू समदडीया, राजेश वरयाणी, बाबु कौरानी उपस्थित होते.