चोपडा प्रतिनिधी । आज दिवसभरात तालुक्यात तब्बल १०० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे तालुक्यातील आजवरच्या रूग्ण संख्येचा आकडा दोन हजारांच्या पार गेला आहे.
चोपडा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याप्रमाणे रूग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्याचे वाटले होते. मात्र गत काही दिवसांपासून सातत्याने ५० पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रूग्ण निष्पन्न होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर आज तब्बल १०० पेशंट आढळून आल्याने यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे.
चोपड्यातील आजच्या रूग्णांची संख्या धरली असता आजवरच्या रूग्ण संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याचे दिसून येत आहे. आजवर तालुक्यातील २०५२ रूग्णांना कोरोनाने ग्रासले आहे. यातील १२०२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ८०३ पेशंटवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४७ रूग्णांचा आजवर मृत्यू झालेला आहे.