यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातुन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन, या कामांचे शुभारंभ गावातील प्रभाग क्रमांक २ मधुन सरपंच जलील सत्तार पटेल यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आली.
कोरपावली ग्रामपंचायतीस सरपंच जलील पटेल यांच्या प्रत्यनांनी चौदाव्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन गावातील गरोदर मातांसाठी एएनसी क्लीनीक रुम बांधकामासाठी सुमारे दोन लाख २७ हजार रूपये, कोरपावली व परिसरातील शेतकरी बांधवांसाठी शेतमाल ने आण करण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी ४ लाख रूपयांचा निधी आणी अनुसुचित जाती जमाती मागास वस्तीच्या प्रभाग २ मध्ये फेव्हर ब्लॉक बसविण्याकरीता ५ लाख ९० हजार रूपयांच्या निधीला चौदाव्या वित्तीय आयोगातुन मान्यता मिळाली असुन या कामांचे शुभारंभ प्रभाग क्रमांक २ मध्ये सरपंच जलील सत्तार पटेल यांच्या शुभहस्ते नारळ फोऊन व प्रार्थना करण्यात येवुन करण्यात आली.
याप्रसंगी उपसरपंच इस्माईल तडवी, ग्रामसेवक प्रविण सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोळंबे, आदीवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मुनाफ तडवी, हमीद तडवी यांच्यासह अजय भालेराव ग्रामपंचायतीचे कर्मचारी किसन तायडे, सोनु तडवी यांच्यासह प्रभागातील ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.