लाचखोर तलाठ्यास पोलीस कोठडी

चाळीसगाव प्रतिनिधी । दाखल्यावर नाव लावण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या तलाठीस आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथील तक्रारदाराचे वडील अलीकडेच मयत झाले होते. त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष प्रताप शिखरे यांनी ३१ जुलै २०२० रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. सदर लाचेची रक्कम २६ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. ही लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली ही कारवाई चाळीसगाव औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यापासुन ५०० मीटर पुढे इस्सार पेट्रोलपंपासमोर रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून संतोष प्रताप शिखरे, (वय-३१, तलाठी- तांबोळे बु ॥, रा- शिवशक्ती नगर,चाळीसगाव) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी तलाठी संतोष शिखरे याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. एस.जी.ठुबे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

Protected Content