Home Cities जळगाव जोकर प्रमाणे उड्या मारण्यात पाक पटाईत-उज्ज्वल निकम

जोकर प्रमाणे उड्या मारण्यात पाक पटाईत-उज्ज्वल निकम

0
36

जळगाव । दाऊदच्या वास्तव्यावरून पाकने केलेले घुमजाव हे अपेक्षितच असून सर्कशीतील जोकर प्रमाणे कोलांट उड्या मारण्यात हा देश पटाईत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. पाक सरकारच्या कोलांट उडीबाबत प्रतिक्रया देतांना ते बोलत होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याची कबूली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. मात्र, अवघ्या २४ तासात पाकिस्तान सरकारने आपल्या वक्तव्याचा घुमजाव केला आहे. याबाबत ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली.

अ‍ॅड. निकम म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने दाऊद इब्राहिमचे वेगवेगळ्या नावाने बनवलेले अनेक पासपोर्ट, नॅशनल आयडेंटिटी नंबर जाहीर केला. हे काल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली असणार. त्यामुळेच पाकिस्तानने नकाराची घंटा वाजवली. पाकिस्तान सरकारवर इसीस आणि पाकिस्तानी लष्करचं प्रचंड दडपण आहे. त्याची ही प्रत्यक्ष पावती आहे.

उज्जल निकम म्हणाले, एखाद्या सर्कशीतील जोकरप्रमाणे पाकिस्तान कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहे. पाकिस्तानने याआधीदेखील अनेकवेळा खोटारडापणा केला. ज्यावेळेला पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीला आले होते. त्यावेळेला त्यांनी कोण दाऊद इब्राहिम? आम्ही ओळखत नाही? आमच्या येथे राहत नाही, अशी नाटकी भाषा केली होती.

२६/११ हल्ल्यानंतर मी आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेलो होतो. तिथे आम्ही आठ दिवस होतो. त्यांना या हल्ल्याचा मास्टमाइंड हाफिज सईद याच्याविरोधात खटला सुरु करा, असे आम्ही सांगितले. तेव्हा ते म्हणाले पुरावे नाहीत. ते म्हणाले तुम्ही पुरावे द्या. मी म्हटलं कट तुमच्या भूमीत रचला गेला. तुम्ही पुरावे शोधा. त्याला त्यांनी अद्यापही उत्तर दिले नाही, असे ते म्हणाले.


Protected Content

Play sound