Home धर्म-समाज जम्मूतील बसस्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करून स्फोट; 18 जण जखमी

जम्मूतील बसस्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करून स्फोट; 18 जण जखमी


News

जम्मू । गेल्या महिन्यात पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण ताजे असतांना आज गुरूवारी पुन्हा जम्मूतील एका बसस्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करून स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १८ नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर नागरीकांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.

जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजारो दिला आहे. गर्दीने गजबजलेल्या बसस्थानकावरच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात झालेल्या जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound