महापौरांच्या मागणीनंतर अत्यावश्यक वस्तू विक्रेत्यांच्या अँटीजन टेस्टला सुरुवात!

 

 

जळगाव,प्रतिनिधी । महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दि.१८ जुलै २०२० रोजी केलेल्या मागणीला यश आले असून जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांची काही ठिकाणी अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी सुरू केली आहे.

बुधवारी स्व.रामलालजी चौबे शाळेत सकाळी ११ वाजता हॉकर्सच्या अँटीजन किटद्वारे कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, उपायुक्त संतोष वाहुळे, डॉ.संजय पाटील आदी उपस्थित होते.

शहरातील हॉकर्स, भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल, इतर विक्रेत्यांची तपासणी करण्याची मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दि.१८ जुलै रोजी मनपा आयुक्तांना पत्र देऊन केली होती. तसेच त्यासाठी अतिरिक्त अँटीजन टेस्ट किट मागवाव्या असेही त्यांनी सांगितले होते.

महापौरांच्या मागणीनुसार बुधवारपासून स्व.रामलालजी चौबे शाळेत अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. हॉकर्स आणि इतर अत्यावश्यक वस्तू विक्रेत्यांची कोरोना तपासणी होणार असल्याने अनेक रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content