पुण्यात ६१ हजार रूग्णांची कोरोनावर मात

पुणे वृत्तसंस्था । शहरातील करोनामुक्त व्यक्तींची वाढती संख्या दिलासा देणारी आहे. काल दिवसभरात १ हजार ८९ बाधित करोनामुक्‍त झाले असून, आतापर्यंत सापडलेल्या एकूण ७७ हजार ३६८ बाधितांपैकी तब्बल ६० हजार ९६३ बाधित ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, नव्याने १ हजार २११ बाधित सापडले आहेत. तर गेल्या २४ तासात ३५ जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १हजार ८४९ वर पोहोचली आहे.

शहरात बाधित संख्या ५०० ते ६०० कमी झाली आहे. मात्र, अत्यवस्थ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मृत्युचा कहर सुरूच आहे. सद्यस्थितीत ८१५ बाधित अत्यवस्थ असून, त्यातील ४८३ जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर ३३२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील विविध रुग्णालयात १४ हजार ५५६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कालपासून नमुने तपासणीच्या संख्येत वाढ झाली आहे. आज ६ हजार ६९० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल ३ लाख ७७ हजार ८१ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

Protected Content