Home राजकीय हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; लोकसभाही लढणार

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; लोकसभाही लढणार


बडोदा (प्रतिनिधी) गुजरातमधील पटेल समुदायाचा युवा नेता हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय. एवढेच नव्हे तर, हार्दिक जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याचे कळतेय.

 

12 मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या बैठकीला काँग्रेसते अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. ज्या जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल उभ राहणार आहेत तेथून सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत. बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एका सभेला संबोधित करणार आहेत. हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते. आम्हाला या लोकांनी देशभक्ती काय असते हे शिकविण्याची गरज नाही, असेही हार्दिक यांनी म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound