चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर येथे पैसे मागण्याच्या कारणावरून एका तरूणावर तलवारीने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील हिरापूर येथील कल्पेश पाटील हा सौरव विजय निकुभ यांच्याकडे उधार दिलेले पैसे वारंवार मागत असे. याचा राग येवून सौरव विजय निकुंभ, सार्थक विजय निकुंभ व विजय निकुंभ आशा मिळुन कल्पेश याला मारहाण केली. याप्रसंगी त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आल्याने कल्पेश हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी कल्पेशचा भाऊ ऋषीकेश संजय पाटील याच्या फिर्यादीवरुन सौरव विजय निकुंभ, गौरव विजय निकुंभ, सार्थक विजय निकुंभ व विजय निकुंभ यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादवी कलम ३०७,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश शिरसाठ करीत आहेत.