जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज (18 ऑगस्ट) रोजी 402 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 13 हजार 176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या 5 हजार 228 रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी गृह अलगीकरणात 1 हजार 101 पॉझिटिव्ह रुग्ण असून जिल्ह्यात आतापर्यंत 85 हजारपेक्षा अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या 2 हजारापेक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत असून आतापर्यंत 85 हजार 84 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 64 हजार 477 चाचण्या निगेटिव्ह तर 19 हजार 82 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर 691 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात सध्या 5 हजार 228 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 163 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 369, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 595 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 1 हजार 101 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षात 378 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 4 हजार 264 रुग्ण असून लक्षणे असलेले 964 रुग्ण आहेत. त्यापैकी 431 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 95 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.
जिल्ह्यात एका दिवसात 498 पॉझिव्टिह रुगण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 19 हजार 82 इतकी झाली आहे. यापैकी 13 हजार 176 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 678 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 3.55 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील सीसीसीमधील एकूण बेडची संख्या 10 हजार 327 इतकी आहे पैकी 6200 बेड अद्याप उपलब्ध आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले बाधित रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 हजार 82 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 4624, जळगाव ग्रामीण 993, भुसावळ 1174, अमळनेर 1564, चोपडा 1448, पाचोरा 729, भडगाव 857, धरणगाव 934, यावल 645, एरंडोल 1052, जामनेर 1276, रावेर 874, पारोळा 850, चाळीसगाव 1073, मुक्ताईनगर 593, बोदवड 293, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 103 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या
जळगाव शहर 3393, जळगाव ग्रामीण 574, भुसावळ 850, अमळनेर 947, चोपडा 921, पाचोरा 512, भडगाव 652, धरणगाव 520, यावल 519, एरंडोल 697, जामनेर 938, रावेर 714, पारोळा 571, चाळीसगाव 610, मुकताईनगर 449, बोदवड 240, इतर जिल्ह्यातील 69 याप्रमाणे एकूण 13 हजार 176 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 5 हजार 228 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 1098, जळगाव ग्रामीण 370, भुसावळ 253, अमळनेर 562, चोपडा 487, पाचोरा 179, भडगाव 186, धरणगाव 384, यावल 82, एरंडोल 331, जामनेर 299, रावेर 99, पारोळा 267, चाळीसगाव 419, मुक्ताईनगर 131, बोदवड 47, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या
जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 678 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 133, जळगाव ग्रामीण 49, भुसावळ 71, अमळनेर 55, चोपडा 40, पाचोरा 38, भडगाव 19, धरणगाव 30, यावल 44, एरंडोल 24, जामनेर 39, रावेर 61, पारोळा 12, चाळीसगाव 44, मुक्ताईनगर 13, बोदवड 6 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 678 रुग्णांपैकी 565 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 346 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.
जिल्ह्यातील 2 हजार 756 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 756 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 60, शहरी भागातील 942 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 754 ठिकाणांचा यामध्ये समावेश असल्याचे डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.