Home Cities एरंडोल एरंडोल येथे गतिमंद मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा

एरंडोल येथे गतिमंद मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा


एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील नगरपालिका कर्मचारी सुरेश दाभाडे यांनी तालुक्यातील सोनबर्डी येथील सहवास विशेष मुलांच्या निवासी केंद्रात जाऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

यावेळी सुरेश दाभाडे यांच्याहस्ते ध्वारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सुरेश दाभाडे यांनी उपस्थित मुलांना खाऊ व जेवण दिले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. मुलांनी जेवण झाल्यावर छोटेखानी मनोरंजनाचा कार्यक्रम केला.

याप्रसंगी सहवास संस्थेचे संस्थापक समाधान सावंत, शिक्षक किशोर पाटील, ईश्वर पाटील, गणेश पाटील, गजानन चौधरी, संदिप सरदार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound